‘रामदेव बाबां’ची ‘डोनाल्ड ट्रम्प’यांच्याशी तुलना

‘रामदेव बाबां’ची ‘डोनाल्ड ट्रम्प’यांच्याशी तुलना

प्रातिनिधि फोटो

जगप्रसिद्ध न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने योगगुरु रामदेव बाबांची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आहे. रामदेव बाबा भारताचे पुढील पंतप्रधान बनू शकतात असेही त्यांनी लिहीले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीदरम्यान रामदेव बाबांनी मदत केली असल्याचेही त्यांनी या अहवालात म्हटलं आहे. रामदेव बाबा बिझनेस आणि राजकीय दोन्ही गोष्टीत सक्रिय असल्यामुळे ही तुलना करण्यात आली. रामदेव हे डोनाल्ड ट्रम्प सारखेच आहे, त्यांनी पंतप्रधानाच्या पदासाठी प्रयत्न करायला हवेत. वृत्तपत्राने लिहिले आहे की,”हिंदूमध्ये रामदेव बाबांचे वेगळ महत्व आहे. लोकांच्या गर्दीमध्ये रामदेव बाबांनी माईक हाती घेतला आणि तेथे असलेल्या ब्रम्हचारी मुलांची ओळख करुन दिली. आणि सर्वांनीच भारत माता की जय अशा घोषणा केल्या. रामदेव बाबांनी योश शिबिर चालवून आज नाव मिळवले. औषधी आणि योगातून लोकांना रोग मुक्त करुन त्यांनी आज आपली वेगळी ओळख निर्माण केली.”

रामदेव आणि ट्रम्प यांच्यातील समानता

ट्रम्प यांच्या जवळ करोडोंनी संपत्ती आहे. पैसे मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केला. तसेच बाबा रामदेव यांची कंपनीची किंमत आज करोडो रुपयांची आहे. बाबांचा वाटा राजकारणातही आहे. पंतप्रधानाची निवडणूक लढल्यावर त्यांची जिंकण्याची संधी आहे. नेहेमीच ते वृत्तवाहिन्यांमध्ये झळकतात त्यांनी कधीही ब्रांडिंची संधी सोडली नाही. भारतात बाबा रामदेवचा चेहरा सर्वठिकाणी आहे.

“कोट्यावधी कमावणारे रामदेव बाबा हे पहिले गुरु आहेत. मागील दहा वर्षांमध्ये त्यांच्या पतंजलि  कंपनीने सर्वाधिक कमाई केली. या आर्थिक वर्षात १.६ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. सर्व वाहिन्यांवर रामदेव बाबांवर विविध कार्यक्रम तयार करण्यात आले. लोकांना पतंजलिच्या जहिराती बघायला आवडतात.”

First Published on: July 29, 2018 4:22 PM
Exit mobile version