ओडिशाच्या महानदीत बस कोसळली; ९ प्रवाशांचा मृत्यू

ओडिशाच्या महानदीत बस कोसळली; ९ प्रवाशांचा मृत्यू

ओडिशामध्ये प्रवासी बस नदीत कोसळली

ओडिशामध्ये बसला भीषण अपघात झाला आहे. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील जगतपूरमध्ये बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. महानदी पुलावरुन प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघातामध्ये ९ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झालाय. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस कटकवरुन अंगुल येथे जात होती. बसमधून ३० प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाचे बसवरील नियंत्रण हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

अशी घडली घटना

कटक वरुन अंगुलला जाणारी बस महानदी पुलाचा कठडा तोडून कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिक नागरिक आणि इतर लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना बसमधून काढूव उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळावरुन अॅम्ब्युलन्स पोहचल्या असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघातामध्ये बसचा चक्काचुरा झाला आहे.

जखमींवर होणार मोफत उपचार

ओडिशाच्या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आरोग्य मंत्री प्रताप जेना यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री स्वत: या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारकडून मदत जाहीर

ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी महानदी पुलावरुन बस कोसळून झालेल्या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत ओडिशा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मोफत उपचार केले जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

First Published on: November 20, 2018 9:39 PM
Exit mobile version