ओम पुरींच्या पत्नीने केकेच्या मृत्यूप्रकरणी केली सीबीआय चौकशीची मागणी

ओम पुरींच्या पत्नीने केकेच्या मृत्यूप्रकरणी केली सीबीआय चौकशीची मागणी

ओम पुरींच्या पत्नीने केकेच्या मृत्यूप्रकरणी केली सीबीआय चौकशीची मागणी

Om Puri’s wife demands CBI probe into KK’s death
KK, Om Puri, CBI probe, ओम पुरी, केके, सीबीआय चौकशी

केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर अनेकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे. यावर प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांच्या दुसऱ्या पत्नी नंदिता पुरी यांनी ही केकेंच्या (KK) मृत्यूवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे.

काय घडले –

केके (KK) यांचे कोलकात्यामध्ये दोन कार्यक्रम होते. कोलकात्याच्या नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये परफॉर्मन्स देत असताना त्यांची तब्येत बिघडली. गर्दी वाढत जाणे, एसी कमी असणे यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्यांना लगेच हॉटेलमध्ये नेण्यात आले. मात्र, तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी रस्त्यातचं त्यांचा मृत्यू झाला.

नंदिता पुरी काय म्हणाल्या –

नंदिता पुरी यांनी फेसबुकवर पोस्ट काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मला बंगालची लाज वाटते. कोलकातानेच केकेंना मारले असून तिथलं सरकार आता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. नजरुल मंचावर पुरेश्या सोयी सुविधा नव्हत्या. या सभागृहाची क्षमता अडीच हजार लोकांची होती. असे असताना या ऑडिटोरियममध्ये सात हजार लोक कसे आले? त्यामुळे एसी कमी झाला. केकेंनी चारपाच वेळा तक्रार केली. पण त्याची काहीच दखल घेतली गेली नाही. त्या ठिकाणी औषधांची सुविधा नव्हती. औषधोपचाराची किट्स नव्हती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी होईपर्यंत बॉलिवूडने कोलकात्यात परफॉर्म करण्यावर बहिष्कार घातला पाहिजे, असे नंदिता यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ओम पुरींच्या पत्नीने केकेच्या मृत्यूप्रकरणी केली सीबीआय चौकशीची मागणी

उद्या होणार अंत्यसंस्कार

केके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर कोलकातामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शन घेतले. केकेंचे पार्थिव आजच मुंबईत आणले जात आहे. रात्री पावणे आठ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल. उद्या सकाळी वर्सोवा येथील स्मशानभूमीत केकेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

First Published on: June 1, 2022 8:30 PM
Exit mobile version