नरेंद्र मोदींची भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती – ओमर अब्दुल्ला

नरेंद्र मोदींची भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती – ओमर अब्दुल्ला

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मृत्यूचा वाढता आकडा ही मोदी सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे’, अशी टीका करणारे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत एकत्र न घेता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरुन अब्दुल्ला यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील निवडणुका पुढे ढकलून मोदींनी भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती पत्करली आहे,’ असं वक्तव्य अब्दुल्ला यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. ‘विधानसभा निवडणुका पुढे ढकलत मोदींनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर नांगी टाकली आहे आणि या शक्तीपुढे त्यांची ५६ इंचाची छाती फेल झाली आहे’, अशा अर्थाची टीका अब्दुल्ला यांनी केली आहे.

‘१९९६ पासून आजपर्यंत जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका पहिल्यांदाच वेळेत होणार नाहीयेत. पुढच्यावेळी एक सक्षम नेतृत्व म्हणून मोदींचं नाव पुढे करताना याचा विचार करावा’, असंही ओमार यांनी म्हटलं आहे.

First Published on: March 11, 2019 9:48 AM
Exit mobile version