Omicron चा संसर्ग रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Omicron चा संसर्ग रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकले आहे. या नव्या व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगितले जातेय. अशा परिस्थितीत या व्हेरिएंटच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मार्ग आहे का? किंवा सरकाराने बुस्टर डोस देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा रा यासंदर्भात तज्ज्ञांना काय वाटते? या प्रश्नांवर तज्ज्ञांचे काय उत्तर आहे जाणून घेऊ.

यावर संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात की, ही लस निश्चितपणे कोणत्याही व्हेरिएंटपासून व्यक्तीला सुरक्षा देत. म्हणजेच काय तर लसीकरण झालेली व्यक्ती लसीकरण न झालेल्या व्यक्तीपेक्षा अधित सुरक्षित असते. परंतु संपूर्ण सुरक्षिततेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांना लसीचा एकचं डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस लवकरं घ्यावा. देशातील १५ टक्के प्रौढांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. अशा परिस्थितीत लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

बूस्टर डोससंदर्भात लहरिया म्हणाले की, सर्वप्रथम देशातील लसीकरण न झालेल्या लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्याची गरज आहे. परंतु यावर संशोधक आणि टेक्निकल एक्सपर्ट्स चर्चा करतायत.

लॉकडाऊनची गरज आहे का?

डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट सर्वाधिक धोकादायक असल्याचे म्हटले जातेय. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन लसीकरण केलेल्या लोकांवर परिणाम करत आहे. अशा स्थितीत लग्नसराई, पार्ट्यांचा सिझन सुरु असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढू लागल्याने चिंता व्यक्त होतेय. व्हायरोलॉजिस्ट डॉ. दीपक आचार्य याविषयी म्हणाले, ‘ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. लोकांनी स्वतः सावध राहणे अधिक महत्त्वाचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका. लॉकडाऊनपेक्षा स्वत: या व्हायरसपासून वाचण्यासाठी प्रयत्न करा.

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी याबाबत सांगितले की, ‘कोरोनाचा नवा व्हेरिएंट आल्याने लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण भारतात या नव्या केसेस शोधणे सोप्पे झालेय. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल. परंतु या विषाणूपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावा, बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही डबल मास्क घालू शकता. याशिवाय ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस अद्याप घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर तो घ्यावा.

डॉ.राहुल पुढे म्हणाले की, आरोग्यासोबतच आपली अर्थव्यवस्थाही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देशात विमान प्रवास किंवा कॅबने प्रवास करू शकता, पण यादरम्यान तुमची सामाजिक जबाबदारी ओळखा. जर तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर त्याची त्वरित कोरोना टेस्ट करुन घ्या. जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर स्वत;ला होमक्वारंटाईन किंवा गजर पडल्यास रुग्णालयात भरती व्हा. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही.


 

First Published on: December 7, 2021 7:59 AM
Exit mobile version