Omicron: ओमिक्रॉनचा धोका कमी पण मृत्यूही होतोय; WHO चा गंभीर इशारा

Omicron: ओमिक्रॉनचा धोका कमी पण मृत्यूही होतोय; WHO चा गंभीर इशारा

Omicron: ओमिक्रॉनचा धोका कमी पण मृत्यूही होतोय, WHO चा गंभीर इशारा

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता आणखी वाढवली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट जागतिक स्तरावरील डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी गंभीर आहे. परंतु या व्हेरिएंटला सौम्य प्रकार म्हणून वर्गीकृत केले नाही. त्यामुळे ओमिक्रॉन तरुण, वृद्धांसाठी गंभीर नसला तरी हलक्यात घेऊ नका कारण यात मृत्यूही होतोय, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

क्लिनिकल मॅनेजमेंटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख जेनेट डियाज यांनी सांगितले की, सुरुवातीच्या अभ्यासातून दिसून आले की, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये प्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत कमी आहे, तरुण आणि वृद्ध दोघांमध्ये तीव्रतेचा धोका कमी असल्याचे दिसून येते. मात्र यात मृत्यू होत आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील अभ्यासांत आणि आकडेवारीमध्ये ओमिक्रॉनमुळे गंभीर संसर्गाचा धोका कमी होतो अशी टिपण्णी करण्यात आली आहे. मात्र यात वयाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र आतापर्यंत अभ्यासलेल्या बहुतांश प्रकरणांमध्ये सर्वाधिक तरुण ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत.

जिनिव्हा येथे एका परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गेब्रियेसुस म्हणाले की, “जरी ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा कमी गंभीर दिसत असला तरी याचा अर्थ असा नाही की तो सौम्य म्हणून वर्गीकृत केला जावा. विशेषत: लसीकरण केलेल्या लोकांमध्ये याचा प्रभाव कमी दिसतोय.

“मागील डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉनमुळे लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागतेय आणि मृत्यूही होतोय असा इशारा WHO ने दिला आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही प्रकरणांची जागतिक स्तरावर नोंद होत असल्याने, आरोग्य यंत्रणेवर जास्त भार पडला आहे. सरकार 5.8 दशलक्ष मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

‘लाखो लोक अजूनही पूर्णपणे असुरक्षित’

टेड्रोस यांनी लसीकरण वाढवण्याबरोबर जागतिक स्तरावर अधिक लसीकरण समानतेचे आवाहन केले आहे. टेड्रोस म्हणाले की, जगातील 109 देश जुलैपर्यंत 70% लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्याचे WHO चे लक्ष्य पूर्ण होऊ शकते. यामुळे महामारीचे लक्ष पूर्ण होण्यास मदत होईल. काही देशांमध्ये बूस्टर डोस दिला जातोय मात्र बूस्ट डोसने महामारी संपुष्टात येत नाही. त्यामुळे अब्जावधी लोक पूर्णपणे असुरक्षित आहेत.


 

First Published on: January 7, 2022 8:23 AM
Exit mobile version