Omicron : आयसोलेशन बेड्स, अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा; केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र पाठवत केल्या ‘या’ सूचना

Omicron : आयसोलेशन बेड्स, अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा; केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र पाठवत केल्या ‘या’ सूचना

Omicron : आयसोलेशन बेड्स, अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र, केल्या या सूचना

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. भारतातही शुक्रवारी एका दिवसात तब्बल १६ हजारांहून अधिक रुग्ण (Coronavirus) आढळून आलेत. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. ओमिक्रॉनचे संकट लक्षात घेता राज्यांनी आयसोलेशन बेड्स, अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या, औषधांची उपलब्धता तसेच मनुष्य बळ वाढवण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत. (health Ministry)

केंद्राच्या सुचना नेमक्या काय आहेत?

सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच युरोप, अमेरिकासारख्या विकसित देशांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं या पत्रात नमूद करण्यात आलेय. याशिवाय ताण झेलणारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करा, अस्थायी रुग्णालयांची निर्मिती करा, यासाठी सीएसआयआर, डीआरडीओ, प्रायव्हेट सेक्टर आणि एनजीओंची मदत घ्या असंही या पत्रात म्हटले आहे.

सर्व होम क्वारंटाईन असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करा, रुग्णांच्या मदतीसाठी कॉल सेंटर, कंट्रोल रुम सज्ज ठेवा, सोबतचं लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी अॅम्ब्युलन्सची सुविधा ठेवा असे निर्देश देण्यात आले आहेत. (omicron case india)

तसेच सर्व राज्यांनी जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष, टेस्टिंग, अ‍ॅम्ब्युलन्स, बेड्स, कोरोनासंदर्भातील सेवा-सुविधांचा विचार करावा. तसेच ग्रामीण भागातील बालरोगविषयक प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करावे. यासाठी राज्यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना आवश्यक आर्थिक मदत द्यावी असे आवाहन केले आहे. (coronavirus cases in india)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यांनी चाचण्यांची संख्या वाढवावी. यात आरटीपीसीआर तसेच रॅपिड आणि अॅन्टिजेन टेस्ट करण्यावर भर द्यावा असंही केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.


SulliDeals नंतर BulliBai अ‍ॅपने मुस्लिम महिला, पत्रकारांना केले टार्गेट, तक्रारीनंतर मुंबई, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु


 

First Published on: January 2, 2022 10:50 AM
Exit mobile version