Omicron Variant : अमेरिकेत ओमिक्रॉनचा कहर; न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक लहान मुलं रुग्णालयात दाखल

Omicron Variant : अमेरिकेत ओमिक्रॉनचा कहर; न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक लहान मुलं रुग्णालयात दाखल

children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. यात अमेरिकेत ओमिक्रॉन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतेय. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत आता अमेरिकेत कडक निर्बंधांचा विचार सुरु आहे. ओमिक्रॉनच्या या संसर्गात आता लहान मुलांना देखील सर्वाधिक धोका निर्माण झालाय. यावर अमेरिकन व्हाईट हाऊसने सांगितले की, ओमिक्रॉन मोठ्या प्रमाणात मुलांना संक्रमित करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत न्यूयॉर्कमध्ये रुग्णालयात भर्ती केलेल्या १८ वर्षांखालील मुलांची संख्या चार पटीने वाढली आहे.

५ वर्षांखालील मुलांना संसर्गाचा धोका अधिक

यासोबतच अमेरिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, रुग्णालयात दाखल मुलांपैकी ५० टक्क्यांहून अधिक ५ वर्षाखालील मुले आहेत. ज्यांचे सध्या लसीकरण झालेले नाही. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत दररोज १,९०,००० कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशातच ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशन काळात संसर्गाचे प्रमाण अधिक वेगाने वाढू शकते, असा अंदाज व्यक्त होतोय. अमेरिकेचे महामारी तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची म्हणाले की, अमेरिकेत चाचणीचा वेग कमी आहे, जो काही दिवसांत अनेक पटींनी वाढवला जाईल.

नागरिकांनी सावध राहणे गरजेचे

डॉ. अँथनी फाउची यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटवर बोलताना सांगितले की, सध्या परिस्थितीत आपल्याला खूप सावध राहण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलणे आवश्यक आहे. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता, अमेरिकेत अनेक फ्लाइट रद्द करण्यात येत आहेत कारण अनेक फ्लाइट अटेंडंटनाच कोरोना संसर्ग झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा कमी धोकादायक मानला जातोय मात्र त्याचा प्रसार डेल्टापेक्षा वेगाने होतोय. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यास आरोग्य यंत्रणेवर त्याचा मोठा ताण पडेल, त्यामुळे खूप त्रास होऊ शकतो.

ओमिक्रॉनपासून संरक्षण कसे करावे

– जर तुम्ही लसीकरणास पात्र असाल तर लवकरात लवकर लस घ्या.

–  बाहेर जाणे टाळा, खूप महत्वाचे काम असेल तर मास्क लावूनच बाहेर पडा.

– गर्दीच्या ठिकाणांपासून स्वतःला दूर ठेवा.

– संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरीत कोरोना चाचणी करा.

– संसर्ग झाल्याची माहिती मिळाली असेल, तर स्वतःला इतर लोकांपासून दूर ठेवा.


 

First Published on: December 27, 2021 9:53 AM
Exit mobile version