Omicron Variant : वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी करा ‘या’ ३ गोष्टी

Omicron Variant : वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी करा ‘या’ ३ गोष्टी

covid cases in india : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, 24 तासात 2 लाख 64 नवे रुग्ण

भारतात नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबरोबरचं कोरोनाचा जुना डेल्टा व्हेरिएंट देखील वेगाने पसरतोय. ओमिक्रॉनमुळे वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता आगामी काळात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशी परिस्थितीपासून वाचण्यासाठी आता भारतात लसीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओमिक्रॉन लसींपासून मिळणारी रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यात पटाईत आहे, त्यामुळे आता भारतातही बूस्टर डोसची मागणी वाढतेय. मात्र या संसर्गापासून वाचण्यासाठी तुम्हाला ३ गोष्टी सांगणार आहोत.

खबरदारी आवश्यक

कोरोना महामारी आणि संसर्गजन्य तज्ञ डॉ चंद्रकांत लहरिया म्हणाले, ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी मास्क लावणे, १ फूटाचे अंतर ठेवणे आणि लसीचे दोन्ही डोस घेणे हे एकमेव शस्त्र आहे. कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. नुसतेच फिरायचे असेल तर बाहेर अजिबात जाऊ नका. कारण ओमिक्रॉन किंवा कोणत्याही व्हेरिएंटचा वृद्धांना जास्त धोका आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी व्यवहार करणे गरजेचे आहे.

बूस्टर डोस गरजेचा

स्टार इमेजिंग आणि पाथ लॅबचे डायरेक्टर डॉ. समीर भाटी म्हणाले की, नागरिकांना बूस्टर डोस देणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत आघाडीवर असलेल्या कामगारांना बूस्टर डोस मिळायला हवा, बऱ्याच लोकांना अद्याप लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही, परंतु आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना तिसरा डोस देणे खूप महत्वाचे आहे.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, भारतात बूस्टर डोस हा पूर्णपणे वैज्ञानिक निर्णय असेल. गरजेनुसार व वेळेनुसार लोकांना बूस्टर देताना विचार केला जाईल. जेव्हा तुम्ही लसीचे दोन डोस घेता, विशेषतः ३ ते ६ महिन्यांनंतर तुमची संरक्षण पातळी कमी होते. तिसरा डोस किंवा बूस्टर घेतल्यानंतर गंभीर समस्यांमुळे रुग्णालयात भरती होण्याची शक्यता कमी आहे.

पर्यटनावर निर्बंध असावेत

जसलोक रुग्णालयाचे वैद्यकीय संशोधन संचालक आणि न्यूरोफिजिस्ट डॉ. राजेश पारीख यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता, सध्या पर्यटन थांबवणे सुरक्षेचे ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी सध्यातरी कुठेही जाऊ नये, हे देशाच्या हिताचे ठरेल. मी स्वतः माझे अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत कारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याची ही योग्य वेळ नाही. आपण हुशारीने वागले पाहिजे. मागील लाटेच्या तुलनेत आपण आधीच तयार आहोत, परंतु संपूर्ण जग या अचानक संक्रमणासाठी तयार नाही. ते हलके घेण्याची चूक आपण करू नये. तो खूप वेगाने पसरत आहे.


Omicron Variant: चिंताजनक! देशात ओमिक्रॉनसह कोरोनाबाधितांमध्ये वाढ; आतापर्यंत २३६ ओमिक्रॉनबाधितांची नोंद


First Published on: December 23, 2021 11:17 AM
Exit mobile version