Omicron Variant : भारतात पुढील काही महिन्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता, AIIMS च्या डॉक्टरांचे संकेत

Omicron Variant : भारतात पुढील काही महिन्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता, AIIMS च्या डॉक्टरांचे संकेत

भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. दिल्लीमध्ये ६ महिन्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. दिल्लीतील तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आता ओमिक्रॉन व्हेरियंट धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे नवीन रूग्ण समोर आले आहेत. याशिवाय एकूण बाधित रूग्णांची संख्या १०७ वर गेली आहे.

दिल्लीत ओमिक्रॉनचे दोन नवे रूग्ण आढळले असून राजधीन दिल्लीमध्ये एकूण संख्या २४ इतकी झाली आहे. एम्स कम्युनिटी मेडिसिन प्रोफेसर संजय राय यांनी दिल्लीतील वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत.

प्रोफसर रॉय यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनचे देशात रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ज्या पद्धतीने आली होती. त्यापद्धतीने ओमिक्रॉनचा धोका भारतातील पुढील येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढू शकतो. व्हारयस अधिकपणे सर्दी आणि गर्मी मध्ये फैलावत नाही. परंतु थंडीमुळे व्यक्तीची इम्यूनिटी पावर कमी होऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला व्हायरसची लागण होते.

व्हायरससाठी सगळ्या उत्तम तापमान २० ते ३० डीग्रीच्या मध्ये असतं. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, फेब्रवारी आणि मार्च महिन्यात व्हायरस पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे या महिन्यांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक वाढतो. असं रॉय यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : नगरपंचायत निकालानंतर आबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही – रोहित पाटील


 

First Published on: December 20, 2021 2:30 PM
Exit mobile version