Omicron Variant : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी लस अधिक प्रभावी, WHO वैज्ञानिकांचे मत

Omicron Variant : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी लस अधिक प्रभावी, WHO वैज्ञानिकांचे मत

जगभरात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतोय. अशात भारतात या व्हेरिएंटबाबत एक दिलासाजनक माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनविरोधात लस अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

यात लसीकरण झालेल्या आणि न झालेल्या लोकांनाही विषाणूची लागण होतेय, मात्र कोरोनाविरोधी लस ओमिक्रॉनवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या जरी वाढली तरी रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे गंभीर लक्षण आढळून येत नसल्याचे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे.

त्यामुळे बहुतांश लोक हलक्या उपचारानेही ठीक होत आहे. परंतु लस घेणे हे आपल्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झालेय. अद्याप कोणत्याही देशांमध्ये क्रिटीकल केअरची गरज भासली नाही ही एक चांगली बाब असल्याचे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी नमूद केले. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवारी एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये शरीरातील टी सेल इम्युनिटी ओमिक्रॉनविरोधात प्रभावी ठरतेय. ज्यामुळे गंभीर लक्षणांपासून बचाव करता येतोय. ज्यामुळे अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण करा.

लसीकरणामुळे मृत्यूचा धोका टळला

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीची परिणामकारकता दोन डोसमध्ये भिन्न आहे. त्यामुळे लसीकरणामुळे डेल्टा संक्रमणासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतोय. त्यामुळे ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरचं जगात लसीकरण मोहिमेचा वेगाने विस्तार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


 

First Published on: December 30, 2021 11:13 AM
Exit mobile version