Omicron Variant : आफ्रिकन देशांसह भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट वेगानं पसरतोय, WHO कडून धोक्याची घंटा

Omicron Variant : आफ्रिकन देशांसह भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट वेगानं पसरतोय, WHO कडून धोक्याची घंटा

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. परंतु देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे पाहिलं असता कोविड-१९ चा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरातील बहुतांश देशांमध्ये शिरकाव केलेला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट अधिक देशांमध्ये पोहोचला असून वेगाने पसरत आहे. तर भारतातही ओमिक्रॉनची प्रकरणं आता समोर येत आहेत. केवळ आफ्रिन देशांमध्येच नाही तर युरोप आणि इतर देशांमध्ये सुद्धा ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

ओमिक्रॉन जगभरातील ६४ देशांमध्ये पोहोचला असून तो अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. WHO चे प्रमुख अॅडोनम गेब्रेयसस यांनी मंगळवारी सांगितलं की, आतापर्यंत ७७ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटने प्रसार केलेला आहे. ओमिक्रॉन डेल्टापेक्षाही वेगाने विस्तारत आहे. आम्ही कोरोनापूर्वी कोणत्याही प्रकाराचा एवढा उच्च वेग पाहिला नाही. असं यूएन हेल्थच्या एजन्सीने सांगितलं आहे.

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता अनेक देशांमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर भारताने विमानतळावर येणाऱ्या प्रवाश्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. तसेच ज्या प्रवाश्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आढळले. त्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ओमिक्रॉनमुळे अनेक देशांनी बूस्टर डोसची मोहीम सुरू केली आहे. मात्र, बूस्टर डोस किती प्रभावी असेल याबद्दल अद्याप कोणताही डेटा नसल्याचं सांगितलं जात आहे.

डब्ल्यूएचओ बूस्टर डोस देण्याच्या विरोधात नाहीये. परंतु लसीकरणाबाबत अद्यापही चिंता ओढावत आहे. केवळ लस कोणत्याही देशाला संकटातून वाचवू शकत नाही. देशात ओमिक्रॉनचा प्रसार थांबला पाहीजे. लसीकरण दर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आहेत. वेगवेगळ्या देशांतील लोकसंख्येच्या गटांप्रमाणे लसीकरणाचे दर वेगवेगळे असतात. असं डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा आपलं रूप बदललं असून तो संपूर्ण जगभरात वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला होता. ज्याला जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. याआधी डेल्टाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, आता डेल्टा पेक्षाही ओमिक्रॉन व्हेरियंट संपूर्ण जगभरात धूमाकूळ घालत आहे.


हेही वाचा : Haiti Oil Tanker Explosion: हैतीमध्ये इंधनाच्या टॅंकरचा भीषण स्फोट, ६० जणांचा मृत्यू तर २० घरं जळून


 

First Published on: December 15, 2021 10:29 AM
Exit mobile version