Narendra Modi : डीपफेकसाठी एआयच्या गैरवापराबद्दल मोदींकडून चिंता, तर बिल गेट्स म्हणतात…

Narendra Modi : डीपफेकसाठी एआयच्या गैरवापराबद्दल मोदींकडून चिंता, तर बिल गेट्स म्हणतात…

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यात आज अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेचा मुख्य मुद्दा तांत्रिक होता. 45 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दोघांनी भारताची आरोग्य व्यवस्था, लसीकरण, तंत्रज्ञान, महिला शक्ती आणि हवामान बदलाविषयी चर्चा केली. (On misuse of AI for deepfake
Concerns from Narendra Modi)

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

2023 च्या जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी AI चा वापर कसा केला हे सांगितले. याचवेळी त्यांनी काशी तमिळ संगम कार्यक्रमादरम्यान AI ने त्यांचे हिंदी भाषण तमिळमध्ये कसे भाषांतरित केले हेही सांगितले. मोदी म्हणाले की, ऐतिहासिकदृष्ट्या, पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान आम्ही मागे राहिलो, कारण आम्ही वसाहत होते. पण मला विश्वास आहे की, आता चौथ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान भारताला खूप फायदा होईल. AI खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण आईला ‘आई’ म्हणतो. पण आता जेव्हा मूल जन्माला येतात तेव्हा ते ‘मी’ तसेच AI म्हणतात, असं मी गंमतीने म्हणतो. कारण आताची मुलंही प्रगत झाली आहेत.

मोदी म्हणाले, मी ठरवले की, भारतात डिजिटल विभाजन होऊ देणार नाही आणि म्हणून आम्ही पायाभूत सुविधा देशभरातील गावांमध्ये नेल्या आहेत. भारतातील महिलांनी झपाट्याने नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. मी ‘नमो ड्रोन दीदी’ योजना सुरू केली आहे. एका महिलेने सांगितले की, तिला सायकल कशी चालवायची हे माहित नाही, पण आता ती ड्रोन उडवू शकते. महिलांचीही मानसिकता बदलली आहे.

हेही वाचा – OBC Bahujan Party : जरांगेंच्या आंदोलनामुळे आधी पक्षाची स्थापना; आता लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर 

मोदी यावेळी डीपफेकसाठी एआयच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी उपाय प्रस्तावित केले. ते म्हणाले, योग्य प्रशिक्षणाशिवाय एवढी चांगली गोष्ट एखाद्याला दिली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. माझ्या मते, आपण वॉटरमार्किंग AI सामग्रीसह सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. जर आपण आळशीपणामुळे AI वर अवलंबून राहिलो तर हा चुकीचा मार्ग आहे. यावर बिल गेट्स म्हणाले की, AI चे सुरुवातीचे दिवस आहेत. ज्या गोष्टी तुम्ही अवघड समजता त्या नंतर सोप्या होतील आणि ज्या गोष्टी तुम्ही सोप्या मानता त्या करण्यात तुम्ही अपयशी ठराल.

First Published on: March 29, 2024 10:50 PM
Exit mobile version