घरोघरी दिवाळी साजरी करा! राममंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपचे आवाहन

घरोघरी दिवाळी साजरी करा! राममंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपचे आवाहन

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असताना भाजपने राममंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त जनतेला घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत आहे. आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामूहीक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यातील जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

५ ऑगस्ट हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता. पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

First Published on: August 3, 2020 8:27 PM
Exit mobile version