ईदच्या दिवशी पुरूषांची गळाभेट; युवतीसाठी ठरली डोकेदुखी

ईदच्या दिवशी पुरूषांची गळाभेट; युवतीसाठी ठरली डोकेदुखी

ईदच्या दिवशी युवतीने घेतली पुरूषांची गळाभेट

रमजान ईदच्या दिवशी एका मुस्लीम युवतीने मोठ्या संख्येने पुरुषांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तो व्हिडीओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला. मात्र या युवतीच्या या कृत्याने मुस्लीम समाजातील काही घटकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लीम धर्मगुरूंनी या युवतीची कृती अयोग्य दर्शवली आहे, तसेच तिला अटक करण्याची मागणीही केली आहे.

अटक करण्याची धर्मगुरूंची मागणी

घेऊन शुभेच्छा देतात, अशी पद्धत आहे. मात्र मुरादाबाद येथे एका मुस्लीम युवतीने १०० पुरुषांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओवर समाजात बरीच चर्चा सुरू झाली आहे. या युवतीने केलेली कृती चुकीचे असल्याचे मुस्लीम धर्मगुरूंनी म्हटले आहे. त्यामुळे तिला अटक करण्याची मागणी जिल्हा इमाम मौलाना रईश अशरफ यांनी केली आहे. शरियत आणि इस्लाममध्ये महिलेने पुरूषाची गळाभेट घेणे पाप ठरविले आहे. केवळ महिला दुसऱ्या महिलेचीच गळाभेट घेऊ शकतात.

बाजारात घेतली गळाभेट

व्हिडिओतील युवतीची ओळख पटली आहे. अलिशा असे या युवतीचे नाव असून मुरादाबाद येथील राहणारी आहे. स्वत: समोर येऊन आपल्या यू-ट्यूब चॅनेलला अधिक हिट्स मिळाव्यात, यासाठी कृती केल्याचे तिने म्हटले आहे. दोन बहिणी आणि मैत्रिणींसह अलिशा बाजारात गेली, तेव्हा तिने हा प्रकार केला.

First Published on: June 23, 2018 3:03 PM
Exit mobile version