‘हिंदू मंदिरं मुक्त’ करण्याच्या अभियानासाठी पुढाकार घेणार’

‘हिंदू मंदिरं मुक्त’ करण्याच्या अभियानासाठी पुढाकार घेणार’

महंत गिरी महाराज

अखिल भारतीय आखडा परिषदेने सोमवारी एक घोषणा केली आहे. अयोध्या रामजन्मभूमी लढ्याप्रमाणेच मथुरा आणि वाराणसी येथील ‘हिंदू मंदिरं मुक्त’ करण्याच्या अभियानासाठी आम्ही पुढाकार घेऊ, यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचे आखाडा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे. सर्व १३ आखाडा प्रमुखांची आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रयागराज येथे पार पडलेल्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला.

‘वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर व मथुरा येथील कृष्ण ज्नमभूमी मुक्त करण्यासाठी आज आम्ही ठराव संमंत केला आहे. मुघलशाहीच्या काळात मुस्लिम आक्रमकांनी आणि दहशवाद्यांनी आमची मंदिरं उद्धवस्त करून त्या ठिकाणी मशिदी व मकबरे बांधले. ज्या प्रमाणे संत समुदयाने आयोध्येतील राम जन्मभूमीसाठी मोहिम राबवली व प्रकरण निकाली निघाले, त्यानुसार आम्ही वाराणसी व मथुराबबात करण्याचे ठरवले आहे. वाराणसी व मथुरा येथील हिंदू मंदिरं पाडण्यात आल्याप्रकरणी आखाडा परिषदेच्यावतीने तक्रारी देखील दाखल केल्या जाणार आहेत.” असं परिषदेचे महंत गिरी म्हणाले.

अयोध्या रामजन्मभूमी निकालानंतर वाराणसी आणि मथुरा येथील मशिदींच्या वादासंदर्भातील आंदोलन सुरु होणार का? अशी चर्चा रंगू लागली होती. याच कालावधीमध्ये विश्व हिंदू परिषदेने १९९२ साली दिलेल्या ‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ चा नाऱ्याची आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.


हे ही वाचा – India – China Crisis: अरूणाचलप्रदेश भारताचा नाही तर तिबेटचा भाग – चीन


First Published on: September 8, 2020 9:48 AM
Exit mobile version