Corona vaccination : पहिल्या डोसनंतर ५० टक्क्यांनी कुटूंबीयांना कोरोना संसर्गाचा धोका टळू शकतो – संशोधन

Corona vaccination : पहिल्या डोसनंतर ५० टक्क्यांनी कुटूंबीयांना कोरोना संसर्गाचा धोका टळू शकतो – संशोधन

अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

देशासह जगभरात कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. नुकत्याच कोरोना लशीबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनात महत्त्वाची बाब समोर आली आहे. ब्रिटनमधील एका अभ्यासानुसार, फायझर किंवा अ‍ॅस्ट्रॉजेनिका लसीचा एकाच डोसमुळे कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून घराच्या इतर सदस्यांना कोरोना संसर्गाचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होते.

पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या संशोधनात असे आढळले आहे की, एखाद्या व्यक्तीने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला तीन आठवड्यांनी कोरोनाचा संसर्ग झाला, तरी लसीचा डोस न घेतलेल्या घरातील इतर सदस्यांना त्या बाधित व्यक्तीपासून संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्के कमी असते.

कोरोनावर लस हाच उत्तम उपाय

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले, “सर्वासाठी एक चांगली बातमी म्हणजे कोरोना लस नागरिकांचे जीव वाचवत आहे. जगभरात कोरोना लसीबाबत झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की, लसीकरणामुळे प्राणघातक कोरोना विषाणूचा संसर्गही रोखला जात आहे. त्यामुळे या विषाणूपासून दूर राहण्यासाठी लस हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.

लसच्या पहिल्या डोसनंतर, संसर्ग होण्याचा धोका 65% कमी

या अभ्यासासाठी, २४,००० घरातील ५७,००० हून अधिक कोरोना संक्रमित रुग्णांचा संपर्कांतील लोकांची माहिती घेण्यात आली. यातील कोरोना लस दिलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील अंदाजे 10 लाख लस न घेतलेल्या कॉन्टेक्ट्सशी तुलना करण्यात आली. मागील अभ्यासामध्ये असे उघड झाले होते की, लसच्या एका डोसमुळे चार आठवड्यांनंतर 65 टक्क्यांनी संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

ब्रिटनने लसीकरणाद्वारे बर्‍याच लोकांचे प्राण वाचवले

पीएचई अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कुटुंबात ट्रान्समिशनचा धोका जास्त असतो. दरम्यान एकाचा घरात राहणाऱ्या किंवा कैद्यांना संक्रमणाचा धोका अधिक असतो. मागील पीएचईने केलेल्या अभ्यासानुसार, यूकेच्या यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे ब्रिटनमध्ये मार्चच्या अखेरीस १० हजारहून कमी मृत्यू झाले.


 

First Published on: April 29, 2021 2:17 PM
Exit mobile version