छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा; एका पोलीस उपनिरीक्षकाला वीरमरण

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा; एका पोलीस उपनिरीक्षकाला वीरमरण

छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षकालाही वीरमरण आल्याचे समजते. श्यामकिशोर शर्मा असे त्या शहीद पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मानपूर ठाणा क्षेत्रातील पारधोनी गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीनंतर घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. तसेच एक एके-४७ रायफल, एक एसएलआर रायफल, दोन ३१५-बोर रायफलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

यासंबधी पोलीस प्रमुख एएसपी जी. एन. बघेल यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री जंगल परिसरात शोध मोहीमेवर निघाले होते. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास गोळीबार सुरू होता.

हेही वाचा –

Coronavirus : देशभरात चोवीस तासांत ३ हजार ३२० नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू

First Published on: May 9, 2020 10:47 AM
Exit mobile version