परदेशी कंपनीत काम करण्याची सीएच्या विद्यार्थ्यांना संधी 

परदेशी कंपनीत काम करण्याची सीएच्या विद्यार्थ्यांना संधी 
सीए करणाऱ्या विद्यार्थ्याना तीन वर्षे आर्टिकलशिप करणे बंधनकारक असते. या कालावधीत त्यांना उदयॊग क्षेत्रात आर्टिकलशिप करण्याची मुभा असते. आता ही आर्टिकलशिप विद्यार्थी परदेशातही करू शकणार आहेत. यासाठी त्यांना ‘इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडिया’ची (आयसीएआय) परवानगी घ्यावी लागणार आहे. 
सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्टिकलशिपसाठीचा कालावधी निश्चित केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात काम करावायाची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना एक वर्ष उद्योग क्षेत्रात आर्टिकलशिप करण्याची मुभा देण्यात येत होती. आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दीड वर्षे उद्योग क्षेत्रात आर्टिकलशिप करण्याची मुभा मिळणार आहे. याचबरोबर परदेशातही आर्टिकलशिप विद्यार्थ्यांना करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना त्या देशातील चार्टड अकाऊंटंटच्या शिखर संस्थेची मान्यता असलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. यासाठी आयसीएआयची परवानगीही घ्यावी लागणार आहे. 
 
विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात काम करण्याचा अधिक अनुभव मिळावा यासाठी काय करता येईल याबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने पाहणी केली तेव्हा असे लक्षात आले की विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या पातळीवर काम करावे लागते. यामुळे त्यांना त्याचा अधिक अनुभव घेता यावा या उद्देशाने आम्ही हा कालावधी वाढविण्याची सूचना करण्यात आली होती. आता विद्यार्थी दीड वर्षे उद्योग क्षेत्रात आर्टिकलशिपक करू शकणार आहे. ही करत असताना विद्यार्थ्याना संस्थेशी नोंदणीकृत असलेल्या सीएच्या हाताखालीच नियुक्ती द्यावी लागणार आहे. सीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राप्तिकर विभाग व इतर सरकारी विभागांमध्ये काम करावयाची इच्छा असेल तर ती करण्याची संधी कशी मिळेल याबाबत आमचा विचार सुरू आहे, असे आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.
First Published on: September 25, 2020 11:01 AM
Exit mobile version