एक्झिट पोलच्या आकड्यांवर जाणून घ्या विरोधकांची प्रतिक्रिया

एक्झिट पोलच्या आकड्यांवर जाणून घ्या विरोधकांची प्रतिक्रिया

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सर्वात शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्याचे मतदान पार पडले. या मतदानानंतर संध्याकाळी विविध राजकीय सर्वेक्षण कंपनींनी आपला एक्झिट पोल सादर केला. हा एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांवर झळकला. प्रत्येत वृत्तसंस्थेचा स्वतंत्र असा एक एक्झिट पोल आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार, असे नारे भाजपच्या गोटातून दिले जात आहे. दरम्यान, या एक्झिट पोलवर विरोधकांनी टिका केली आहे.

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे. आपला कुठल्याही एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे ममता म्हणाल्या आहेत. यासोबतच त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

राहुल गांधी

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण निवडणूक आयोगाचा सन्मान करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी ‘नमो टीव्ही’, केदारनाथ येथील मोदींची ध्यानसाधना यावर टीका केली आहे.

चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले आहे. एक्झिट पोल पुन्हा एकदा वस्तुस्थिचा अभ्यास करण्यात कमी पडले आहेत. स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी आहे. ती परिस्थिती समजून घेण्यात एक्झिट पोल कमी पडले आहे.

शशी थरुर

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी देखील एक्झिट पोल चुकीचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया देशाचे उदाहरण दिले आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया देशात ५६ वेगवेगळ एक्झिट पोल आले होते. ते सर्व चुकीचे
ठरले होते, असे शशी थरुर म्हणाले आहेत.

योगेंद्र यादव

राजकीय विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेस मरणार आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले आहेत. यापुढे ते म्हणाले की, काँग्रेस भारतीय लोकशाहीस वाचवण्यासाठी भाजपला निवडणुकीत थांबवू शकले नाही तर भारतीय पक्षामध्ये या पक्षाची कोणतीही सकारात्मक भूमिका राहणार नाही.

First Published on: May 20, 2019 3:23 PM
Exit mobile version