शरद पवारांच्या निवासस्थानी दुपारी विरोधकांची बैठक, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता

शरद पवारांच्या निवासस्थानी दुपारी विरोधकांची बैठक, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठकी आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली आहे. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे. यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्टला मतदान होऊन निकाल जाहीर होणार आहे.

संजय राऊत राहणार उपस्थित –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपराष्ट्रपती पदासंदर्भातील शरद पवार यांच्या घरी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

भाजपने जाहीर केली उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी –

भाजपच्या संसदीय मंडळाची काल (16 तारखेला) बैठक झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनखड याअगोदर पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी जगदीप धनखड यांच्याशी संघर्ष होत राहिला आहे.

First Published on: July 17, 2022 1:13 PM
Exit mobile version