काँग्रेसचे इतर दिग्गज नेतेही जाणार तुरुंगात – डॉ. सुब्रमण्यम स्वामी

काँग्रेसचे इतर दिग्गज नेतेही जाणार तुरुंगात – डॉ. सुब्रमण्यम स्वामी

डॉ. सुब्रमण्यम स्वामी

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज काँग्रेस पक्षातील चिंतेच्या वातावरणावर भाष्य केले आहे. ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना स्वामी म्हणाले की, ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या प्रकरणात लवकरच सुनवाई होणार असून पी. चिदंबरम नंतर कॉग्रेसचे जामिनावर असलेले दिग्गज नेते याच परिस्थितीचा सामना करणार आहेत. स्वामी पुढे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्ष नेहमी काँग्रेस मुक्त भारताचा नारा देत आला आहे. आम्हाला विदेशी काँग्रेस पासून मुक्तता हवी आहे. काँग्रे ने स्वदेशी स्वरूप स्वीकारले तर त्यांचे लोकशाहीत स्वागत केले जाईल.’


हेही वाचा – पी. चिदंबरम यांच्याच हस्ते झाले होते ‘त्या’ सीबीआय कार्यालयाचे उद्घाटन


नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती याचिका

पी. चिदंबरम त्यांच्या विरुद्ध अनेक वर्षांपासून वातावरण निर्मिती करण्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. विशेष म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेमुळेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावर आहेत.

First Published on: August 22, 2019 2:25 PM
Exit mobile version