मुस्लिमांचा अपमान केला तर… रश्दींवरील हल्ल्याच्या आरोपांवर इराणचे उत्तर

मुस्लिमांचा अपमान केला तर… रश्दींवरील हल्ल्याच्या आरोपांवर इराणचे उत्तर

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर इराणवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. रश्दींवर इराणणेच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याबाबत इराणने आता एक निवेदन जारी केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, तेहरानला सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार धरण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील मुस्लिमांच्या बदनामी, अपमान केल्यामुळे रश्दी आणि त्यांचे समर्थक अशा हल्ल्यास आणि निषेधास पात्र आहेत. यामुळेच ही घटना घडली आहे.

रश्दींनी धर्माचा केलेला अपमान योग्य नाही

रश्दी यांच्यावरील हल्ल्याबाबत इराण मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच रश्दी यांना धर्माचा अपमान करण्यास समर्थन देत नाही. त्यांची 1988 मधील “द सॅटॅनिक व्हर्सेज” ही कादंबरी काही मुस्लिमांनी निंदनीय परिच्छेद म्हणून पाहिले. सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याच्या संदर्भात, आम्ही त्यांच्या समर्थकांशिवाय इतर कोणालाही निषेधास पात्र मानत नाही, असे कनानी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबतीत इराणला दोषी ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

रश्दींना गंभीर दुखापत

रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातील लेखक आणि राजकारण्यांनी निषेध केला आहे. त्याच्या एजंटने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, रश्दीला त्याच्या हातातील रक्तवाहिनी आणि यकृताला झालेल्या जखमांसह गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याचा एक डोळा गमावण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : 30 ऑगस्टपर्यंत अटकेचा कायदा समजून घ्या, अन्यथा… हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

First Published on: August 16, 2022 9:31 AM
Exit mobile version