भारतात ५० पेक्षा जास्त डॉक्टर व नर्सेसना कोरोनाची लागण

भारतात ५० पेक्षा जास्त डॉक्टर व नर्सेसना कोरोनाची लागण

चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

भारतात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून आता या महामारीची लागण रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ,नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही होत आहे. अद्यापपर्यंत देशभरात ५० डॉक्टर्स ,नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱी कोरोना पॉझीटीव्ह झाले आहेत. या आकड्यावर सरकारची नजर असून आरोग्य यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यात काही डॉक्टर्सला कोरोना रुग्णांची सेवा करताना लागण झालेली नसून परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या ते संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे. यामुळे अशा डॉक्टर्स व नर्सेस व इतरांचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. सध्या कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहाता अनेक रुग्णालयात डॉक्टरांना व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक PPEs या कोरोना संरक्षक सूटची कमतरता भासत आहे. यामुळे अनेकवेळा जीव धोक्यात घालून त्यांना रुग्णांची सेवा करावी लागत आहे. हीच स्थिती इटलीतही निमार्ण झाली होती. तेथेही अनेक डॉक्टरांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. भारतातही सध्या थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती निमार्ण झाली आहे. तसेच या संसक्षक सूटची परदेशातही ऑर्डर देण्यात आल्या आहेत.

First Published on: April 3, 2020 4:48 PM
Exit mobile version