जमिनीवरील घडामोडींची ‘यांना’ माहिती नसते, ओवैसींची सरसंघचालक व मुस्लीम नेत्यांवर टीका

जमिनीवरील घडामोडींची ‘यांना’ माहिती नसते, ओवैसींची सरसंघचालक व मुस्लीम नेत्यांवर टीका

हैदराबाद – गेल्या महिन्यात काही मुस्लीम नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भात बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी मुस्लीम नेत्यांवर टीका केली आहे. हे सर्व उच्चविभूषीत असून त्यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.

ओवेसींची काय म्हणाले –

गेल्या महिन्यात माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलपती लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांनी मोहन भागवतांची भेट घेतली होती. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पाच जणांनी भागवत यांची भेट घेतली. संपूर्ण जगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा माहीत आहे. मुस्लीम समाजातील हा उच्चभ्रू वर्ग आहे. जमिनीवर नेमक्या काय घडामोडी घडतात, याबाबत या लोकांना माहिती नसते. वास्तविकतेशी यांचा काहीही संबंध नाही. मुळात कोण कोणाला भेटते हा ज्याचा त्याचा वयक्तिक विषय आहे. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरैशींची प्रतिक्रिया –

गेल्या महिन्याच्या झालेल्या बैठकीसंदर्भात माजी सीईसी कुरैशी म्हणाले होते की मोहन भागवत यांनी देशातील परिस्थितीबद्दल काळजी वाटत असल्याचे म्हटले आहे. देशात आज जे वातावरण आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. देश केवळ सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

First Published on: September 23, 2022 8:26 AM
Exit mobile version