राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती

काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत नुकतेच सहभागी झालेले केरळचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पी. सी चाको यांना केरळच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्याची परवानगी दिली आहे. टी पी पीथंबरम हे सध्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल यांनी पी सी चाको यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. तसेच त्यांना उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

केरळ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी कठोर परिश्रम घ्याल असे सांगतानाच पी. सी. चाको यांना यशस्वी कालावधीसाठी प्रफुल पटेल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. केरळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने पीथंबरम यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन बदलण्याची विनंती राष्ट्रीय नेतृत्वाकडे केली होती. यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून पी.सी. चाको यांची शिफारस करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पुर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. ते विधानसभा निवडणूकीत एलडीएफच्या निवडणूकीच्या प्रचारात सहभागी होते. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी हा यूपीएचा भाग आहे.

First Published on: May 19, 2021 4:22 PM
Exit mobile version