Padma Awards : दिवंगत CDS जनरल रावत यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’, गुलाम नबी आझादांचा ‘पद्मभूषण’ने सन्मान; पाहा संपूर्ण यादी

Padma Awards : दिवंगत CDS जनरल रावत यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’, गुलाम नबी आझादांचा ‘पद्मभूषण’ने सन्मान; पाहा संपूर्ण यादी

Padma Awards : दिवंगत CDS जनरल रावत यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण', गुलाम नबी आझादांचा 'पद्मभूषण'ने सन्मान; पाहा संपूर्ण यादी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक दिग्गजांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी दिवंगत CDC जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. जनरल रावत यांचा गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या शौर्याला सलाम करत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कामासाठी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांनाही पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याशिवाय SII चे MD सायरस पूनावाला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. मात्र आज राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 128 जणांचा समावेश आहे. यापैकी चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी गुरमीत बाबा (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या मुलीने स्वीकारला. बाबांचे कलाक्षेत्रात मोठे योगदान आहे.

पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना पद्मभूषण देऊन गौरविले.

SII चे MD सायरस पूनावाला यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

राधे श्याम खेमका (मरणोत्तर) यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या मुलाला हा पुरस्कार प्रदान केला.

साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या कार्यासाठी, सच्चिदानंद स्वामी यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हॉकीपटू वंदना कटारिया हिला राष्ट्रपती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरा नेमबाज अवनी लेखरा हिला क्रीडा प्रकारातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी योग क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

First Published on: March 21, 2022 8:30 PM
Exit mobile version