एक बटाटा ६ कोटी ७६ लाखांचा!

एक बटाटा ६ कोटी ७६ लाखांचा!

प्रातिनिधिक फोटो

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे मध्यमवर्गीय माणूस चांगलाच वैतागला आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या साध्या कांदे-बटाट्यांचा भावही आजकाल खिशाला न परवडणारा झाला आहे. अशा परिस्थितीत एक बटाटा ६ कोटी ७६ लाख रुपयांना विकत घेणारा माणूस तुम्हाला भेटला तर? कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी ही घटना साधारण दोन वर्षांपूर्वी वास्तवात घडली होती. आजही सोशल मीडियावर ही घटना ताजी आहे. लंडनच्या एका व्यापाराने तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपयांना एक बटाटा विकत घेतला. मात्र, हा बटाटा त्याने एका पेंटिंगच्या स्वरुपात खरेदी केला होता. अर्थात एका बटाट्याच्या पेंटिंगसाठी त्याने तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपये मोजले. बटाटा जरी साधासुधा असला तरी त्याचं ते पेंटिंग मात्र काही कोटीं रुपयांचं होतं.

पेंटिंगमध्ये खास काय?

हे पेंटिंग मुळात बटाट्याचा एक फोटो होता. आयरिश फोटोग्राफर लेन्समन केव्हिनने अनेक वर्षांपासून तशाच पडून असलेल्या एका जीर्ण बटाट्याचा फोटो आपल्या कॅमेरात टिपला होता. या फोटोची छानशी फ्रेम करुन केव्हिनने त्याच्या एक्झिबीशनमध्ये ती विकायला ठेवली होती. फोटोग्राफीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या केव्हिनच्या या पेंटिंगची बोली लागली तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपये. ब्लॅक ड्रॉप फोटोग्राफी आणि अॅबस्ट्रॅक्ट फोटोग्राफीसाठी क्वेहिन प्रसिद्ध असल्यामुळेच बहुधा त्याच्या या फोटोची इतकी महागडी बोली लागली असावी. युरोपचा एक व्यापारी बटाट्याचा हा फोटो पाहताच प्रभावित झाला आणि ६ कोटी ७६ लाख रुपये देऊन ते पेंटिंग खरेदी केलं.

First Published on: July 31, 2018 1:13 PM
Exit mobile version