वजनदार होणे पडले महाग! १४० फ्लाईट अटेंडेंटला काढले ड्यूटीवरून

वजनदार होणे पडले महाग! १४० फ्लाईट अटेंडेंटला काढले ड्यूटीवरून

वजनदार होणे पडले महाग! १४० फ्लाईट अटेंडेंटला काढले ड्यूटीवरून

ओव्हर वेट म्हणजे जास्त वजनामुळे १४० फ्लाईट अटेंडेंटला जुलैच्या उड्डाणासाठी ड्यूटी रोस्टरमधून काढल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स (पीआयए)ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व फ्लाईट अटेंडेंटला उड्डाण ड्यूटीपासून वेगळे गेले केले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उड्डाण कंपनीने अनेक पुरुष आणि महिला फ्लाईट अटेंडेंटला अपेक्षेपेक्षा जास्त वजन असल्यामुळे ड्यूटी रोस्टर आणि जाहिरातींमध्ये सामील करण्यावर बंदी घातली आहे. कोरोना महामारी दरम्यान फ्लाइट अटेंडेंट डाएट प्लॅनचे पालन करू शकले नाही आहे. त्यामुळे त्यांचे वजन वाढले आणि तेच त्यांना महागात पडले आहे.

पीआयएच्या प्रवक्ताने सांगितले की, सतत तक्रार होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ड्यूटीवर काढलेल्या फ्लाईट अटेंडेटची संख्या ८५ आहे. एअरलाईन्सने कारवाई करण्यापूर्वी ओव्हर वेट फ्लाइट अटेंडेंट यांना इशारा दिला गेला होता. २०१९मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीने आंतरराष्ट्रीय विमानातून ओव्हर वेटमुळे फ्लाईट अटेंडेंटला हटवण्याच्या प्रस्तावावर विचार केला होता.

माहितीनुसार, १ जानेवारीला पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA)ने काम करत असलेल्या १८०० हून अधिक केबिन क्रूला जारी केलेल्या एका निवेदनाता सांगितले होते की, आवश्यकतेनुसार बारीक व्हा, नाहीतर सहा महिन्यात नोकरी सोडण्यास तयार राहा. हा आदेश आमिर बशीर एअरलाईन्स महाप्रबंधकद्वारे जारी केला गेला होता. यामध्ये असा सल्ला देण्यात आला होता की, जास्त वजन असलेल्या चालक दलाला एक महिन्यात पाच पौंड वजन कमी करणे आवश्यक आहे. सध्या ३० पौंडहून अधिक फ्लाईट अटेंडेंटला अजूनही फ्लाईट ड्यूटीसाठी पात्र आहे. पीआयएने आपल्या जास्त वजन वाल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळी उंची आणि शरीराच्या प्रकारासाठी एक वजनाचा तक्ता देण्यात आला होता.

First Published on: June 28, 2021 5:36 PM
Exit mobile version