पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट?

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट?

अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याची योजना आखत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राम मंदिरावरील हल्ल्यासाठी या दहशतवादी संघटनांनी नेपाळमार्गे दारूगोळा आणि आत्मघाती बॉम्बर आणण्याची योजना आखली असल्याचीही माहिती समोर आली आहे. (pakistan based terror groups planning major attack on ram janam bhumi in ayodhya)

‘News 18’ या वृत्तसंस्थेने अयोध्येतील राम मंदिरावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेनी हल्ला करण्याचा कट रचल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तातील माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट यावेळी अयोध्येतील रामजन्मभूमीवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहेत. जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या एकमेव दहशतवादी संघटना आहेत ज्या प्रामुख्याने राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत. या दहशतवादी गटांनी नेपाळमार्गे दारूगोळा आणि आत्मघाती बॉम्बर आणण्याची योजना आखली असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

या वृत्तामधील गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये मंदिर तयार होण्यापूर्वी रामजन्मभूमीवर हल्ला करणे हे आता या दहशतवादी संघटनांचे मुख्य लक्ष्य बनले आहे. या हल्ल्याचा कट अंमलात आणण्याचा तसेच हिंदू-मुस्लिम जातीय हिंसाचाराची मोठी भूमिका जगासमोर मांडण्याचा या दहशतवादी संघटनांचा हेतू आहे. या संदर्भात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या काही मजबुरीही समोर आल्याचे गुप्तचर सूत्रांचे मत आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानची आयएसआय स्पष्टपणे अपयशी ठरली आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा पाक लष्कराचा कोणताही प्रयत्न भारतीय लष्कराने यशस्वीपणे रोखला आहे. त्यांचे सर्व बोगदे शोधून काढण्यात आले असून अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा अंकुश लावण्यात आला आहे.


हेही वाचा – विवाहाचे आमिष दाखवून ठेवलेले शरीर संबंध म्हणजे बलात्कार नव्हे; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

First Published on: January 10, 2023 3:37 PM
Exit mobile version