समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवली

समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवली

समझौता एक्सप्रेस

भारत -पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेसला रद्द केली आहे. पुढील आदेश येत नाही तोपर्यंत ही ट्रेन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लाहौरवरुन भारतात येणारे प्रवासी अडकले आहेत. तर आता दिल्लीवरुन लाहौरला जाणारी समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवण्यात आली आहे. त्यामुळे अटारीला अनेक प्रवासी अडकले आहेत. पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे अधिकाऱ्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानकडून ट्रेन रद्द

भारतातून पाकिस्तानला जाणारी समझौता एक्स्प्रेस बुधवारी नवी दिल्लीवरुन तिच्या नियमित वेळेनुसार निघाली. मात्र ही एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर अडवण्यात आली. पाकिस्तानने या एक्स्प्रेसला रद्द केले. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये लाहौरचे १८ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी कराचीवरुन ट्रेनमध्ये चढले होते. ते आता लाहौरमध्ये अडकले आहेत. समझौता एक्स्प्रेस दिल्लीवरुन आठवड्यातून दोन वेळा सुटते. बुधवार आणि रविवारी ही एक्स्प्रेस दिल्लीवरुन अटारीला जाते तिथून ती लाहौरला जाते. त्यानंतर ही ट्रेन लाहौरवरुन अटारीसाठी सोमवार आणि गुरुवारी निघून दिल्लीत येते. गुरुवारी समझौता एक्स्प्रेस लाहौरसाठी गेलीच नाही. पाकिस्तानकडून ही ट्रेन रद्द करण्यात आली. भारताकडून ट्रेन रद्द होण्याची काहीच बातमी आलेली नाही.

प्रवासी चिंतेत आले

फिरोजपूर डीआरएम विवेक कुमार यांनी सांगितले की, बुधवारी रवाना झालेली समझौता एक्स्प्रेस अटारी बॉर्डरवर उभी आहेत. आतापर्यंत याचा निर्णय घेतला गेला नाही की, ट्रेनमधील प्रवासी कुठे जाणार आहेत. सर्व प्रवासी चिंतेत आहेत. कारण समझौता एक्स्प्रेसला पाकिस्तानने रद्द केले. असे सांगितेल जाते की, दिल्लीवरुन अटारीला जाणारी समझौता एक्स्प्रेस ११.२० वाजता रवाना झाली. या ट्रेनमध्ये ३ पाकिस्तानी आणि २४ भारतीय नागरिक प्रवास करत होते. आता मध्येच ही ट्रेन थांबल्यामुळे सर्व प्रवासी चिंतेत आले आहेत.

First Published on: February 28, 2019 12:43 PM
Exit mobile version