पाकिस्तान आणि चीनचा डर्टी हनीट्रॅप गेम, रडारवर भारताचे लष्कर अधिकारी

पाकिस्तान आणि चीनचा डर्टी हनीट्रॅप गेम, रडारवर भारताचे लष्कर अधिकारी

'या' प्रसिद्ध वेबसाईटवर पॉर्न पाहताय तर सावधान!

भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने (Online Honeytrapping) ऑनलाईन हनीट्रॅपचा डर्टी गेम सुरू केला आहे. या गेमच्या जाळ्यात काही भारतीय अधिकारी सापडले असून त्यांच्याकडून भारतीय लष्कराची माहिती (Classified Information) मिळण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे गुप्तचर यंत्रणांबरोबरच लष्करही अलर्ट झाले असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भारतीय लष्कराचे अधिकाऱी गोपनीय माहिती तर लिक करत नाहीयेत ना याचाही तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या हनीट्रॅपच्या डर्टी गेम ग्रुपमध्ये सामान्यांबरोबरच अनेक आजी माजी लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

भारताची आतली गोपनीय माहिती काढण्यासाठी पाकिस्तान आणि चीन काहीही करण्यास तयार आहेत. या दोन्ही देशांच्या सायबरने आपलं संपूर्ण लक्ष भारताच्या क्‍लासिफाइड इनफॉर्मेशन आणि डेटा काढण्याकडे वळवलं आहे. यामुळे भारतीय लष्कर वेळोवेळी आपल्या जवानांना सोशल मीडिया हाताळण्यास मनाई करत आहे. गेल्या काही वर्षांपासून लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही कामाच्या वेळांमध्ये व्हॉट्अप वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच अधिकाऱ्यांना त्यांचे फेसबुक , इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद ठेवण्याचा , डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर भारताच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत. लष्करी अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून हवी ती माहिती काढण्यासाठी या देन्ही देशांनी तरुण-तरुणींना खास प्रशिक्षण दिले आहे. काही वर्षांपूर्वीही पाकिस्तानी हेरांनी महिला असल्याचे भासवत अनेक बारतीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये फसवले. त्यांच्याकडून गोपनीय माहितीही मिळवली होती. २०१८ सालीही भारतीय वायुदलाच्या मुख्यालयात तैनात असलेल्या एका ग्रुप कॅप्टनलाही ऑनलाईन हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते. त्यानंतर नौदलाने सर्वच जवान आणि कर्मचाऱ्यांना फेसबुक वापरण्याआवर बंदी घातली होती.

पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतावर नजर ठेवून आहेत. भारताच्या हालचाली टिपण्याची एकही संधी हे दोन्ही देश सोडत नाहीत. तसेच कश्मीर मुद्दयावरून पाकिस्तान आणि भारत यांच्यात कायमच शीतयु्दध सुरू असते. तर गलवान येथे चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनही भारताकडे डोळे वटारून बघण्याची एकही संधी सोडत नाहीये.

 

First Published on: April 20, 2022 6:29 PM
Exit mobile version