पाकिस्तान संघ व्यवस्थापन नीच, मला मेंटली टॉर्चर केले : मोहम्मद आमीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तान संघ व्यवस्थापन नीच, मला मेंटली टॉर्चर केले : मोहम्मद आमीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनाकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अखेर पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा गुरूवारी केली. संघ व्यवस्थापनाने अतिशय नीच दर्जाची वागणुक दिल्याचा आरोप मोहम्मद आमिरने केला आहे. याआधीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पाकिस्तानच्या न्यूझिलंड दौऱ्यात ३५ जणांच्या टीममध्ये त्याची निवड झाली नव्हती. तर पाकिस्तानातच असलेल्या झिंबाब्वे दौऱ्यासाठीही त्याची दखल घेण्यात आली नव्हती.

मला आणखी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळोयचे नाही. याआधीच आमिरला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. मी एकदिवसीय क्रिकेटसाठी नेहमीच उपलब्ध होतो. पण मला पाकिस्तान संघ व्यवस्थापनाकडून मात्र अतिशय नीचपणाची वागणूक देण्यात आली, हे सगळ अमान्य होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आमीरच्या निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्यपदी असलेले वसीम खान यांनी आमीरशी गुरूवारी दुपारी चर्चा केली. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळातील सामन्यांसाठीही मी उपलब्ध नसेल असे त्याने स्पष्ट केले आहे. आमीरचा हा वैयक्तिक निर्णय असून त्याचा पीसीबी आदर करते असे पाकिस्तान बोर्डाने स्पष्ट केले आहे.

आमीरने गेल्या वर्षी जुलैमध्ये कसोटी क्रिकेटचा राजीनामा दिला तेव्हा हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनिस यांनी आमीरवर आगपाखड केली होती. पाकिस्तान संघाला धोका दिल्याचा आरोप वकार युनिसने आमीरवर केला होता. फक्त पैशांसाठी लिग क्रिकेट खेळायला जात आहे असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. पण मला माझ्या शरीराचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे आगामी क्रिकेटसाठी माझी तब्येत चांगली ठेवण्यासाठी मी क्रिकेट खेळत असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. आमीरची लोकप्रियता २०१० साली संघात आगमन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेत आली होती. पाकिस्तानचे जलद गोलंदाज वसीम अक्रम यांनीही आमीरचा उल्लेख सर्वात हुशार जलदगती गोलंदाज असा केला होता. आमीरची घौडदौड तेव्हा थांबली, जेव्हा त्याच्यावर स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात पाच वर्षांची बंदी आली. आमीर हा टेस्ट टीमचा कॅप्टन असलेला सलमान बट्ट आणि मोहम्मद आसीफ यांच्यासोबत स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात रंगेहात पकडला गेला होता. २०१० च्या प्रकरणात त्याने सातत्याने नो बॉल्स टाकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या तीन खेळाडूंपैकी फक्त आमीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळला होता. चॅम्पिअन्स ट्रॉफित भारताविरोधातील सामन्यात आमीरने घेतलेल्या तीन विकेट्समुळे पाकिस्तानला चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकता आली होती. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत आमीरच्या १७ विकेट्ससह त्याची जगातला बेस्ट बॉलर म्हणून कामगिरी त्याने केली होती. आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६ कसोटी सामन्यात ११९ विकेट्स घेतल्या. तर ६१ एकदिवसीय सामन्यात ८१ विकेट्स आणि ५९ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात त्याने ५० विकेट्स घेतल्या. मला निवृत्तीच्या वेळी इतकच सांगायच आहे की, माझ्यात दोन व्यक्तींनी सर्वाधित गुंतवणुक केली ती म्हणजे, नजाम सेठी ( पीसीबीचे माजी अध्यक्ष) आणि शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान)चा माजी कप्तान. या दोघांनीच मला आधार दिला. त्यानंतर मात्र सगळ्याच खेळाडूंनी माझ्यासोबत खेळण्यासाठी नकार दिला.

First Published on: December 17, 2020 6:48 PM
Exit mobile version