पाकच्या मतानुसार हाफिज सईद दहशतवादी नाही

पाकच्या मतानुसार हाफिज सईद दहशतवादी नाही

हाफीज सईद

दहशतवादाला पाकिस्तान कोणत्याही प्रकारचा थारा देणार नाही. भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकार कायम पुढाकार घेईल. अशा बतावण्या पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्नान खान यांनी केल्या होत्या. पण सत्तेवर येऊन सहा महिने होण्यापूर्वीच इम्नान खान सरकारनं पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी संघटनांवरील बंदी उठवली आहे. इम्रान खान सरकारनं मुंबईवरील दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या हाफिज सईदच्या जमात – उल – दावा आणि फलाह – ए – इन्सानियत फाऊंडेशनवरील बंदी देखील उठवली आहे. पाकचे माजी राष्ट्रपती ममनून हैसन यांनी अध्यादेश काढला. त्यानंतर जमात – उल – दावा या हाफिजच्या संघटनेवर बंदी आणली होती. यानंतर हाफिज सईदनं कोर्टात देखील धाव घेतली होती. पण, इम्नान खान सरकारनं मात्र सत्तेवर येऊन सहा महिने होण्यापूर्वीच या संघटनांवरची बंदी उठवली आहे.

सरकार बदलले तरी दहशतवादी कारवाया सुरूच

सत्तेवर आल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्यावर आमचा भर असेल. शिवाय, दहशतवादाला थारा नसेल अशा बतावण्या इम्नान खान सत्तेत येण्यापूर्वी करत होते. पण, सत्तेमध्ये येताच भारतातील दहशतवादी कारवाया वाढल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यात इम्नान खान यांना लष्कराचा पाठिंबा आहे. अशावेळी लष्कराच्या विरोधात जाणं इम्रान खान यांना शक्य आहे का? हा देखील प्रश्नच आहे. कारण पाकिस्तानमध्ये लष्करापुढे सरकारचं काहीही चालत नाही हा आजवरचा इतिहास आहे. दरम्यान, दहशतवादी कारवाया थांबत नाहीत तोवर पाकशी चर्चा नाही असा इशारा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. तर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे आम्ही दहशतवाद पोसत नाही असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे.

First Published on: October 26, 2018 1:51 PM
Exit mobile version