पाकिस्तानने काश्मीरबाबत करार केला होता; पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

पाकिस्तानने काश्मीरबाबत करार केला होता; पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली : पाकिस्तानचे निवृत्त जनरल लष्करप्रमुखांनी काश्मीरबाबत भारतासोबत करार केला होता, असा दावा पाकिस्तानच्या प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराने केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ निर्माण होणार असून भारतामध्येही चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही पत्रकार हमीद मीर (Hamid Mir) यांनी निवृत्त जनरल लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा (Qamar Javed Bajwa) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मीर यांनी बाजवा लष्करप्रमुख असताना भारताकडून काश्मीरबाबत झालेल्या कराराचा उल्लेख केला आहे. इम्रान खान पंतप्रधान असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2019 काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानला भेट देणार होते, असा दावाही त्यांनी केला. मीर यांच्या वक्तव्यामुळे आर्थिक संकटात आणि गृहयुद्धाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये खळबळ निर्माण होणार आहे.

हमीद मीर यांनी काय दावे केले?
पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर आणि नसिम जेहरा पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलच्या चर्चासत्रात उपस्थित होते. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हमीद मीर म्हणाले की, ‘मी फक्त काश्मीरसाठी प्रार्थना करू शकतो. कारण जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरबाबत केलेल्या कराराचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारतासोबत युद्धबंदी केली होती. त्या युद्धबंदीनंतर मोदी लगेचच पाकिस्तानला भेट देणार होते. त्यांनी सांगितले की, परराष्ट्र खात्याला मोदी पाकिस्तानला येणार हे समजल्यावर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खानकडे यांच्याकडे धाव घेतली. परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी इम्रान खान यांना विचारले तुम्हाला याबाबत माहीत आहे का? तेव्हा इम्रान यांनी बाजवा साहेब आणि फैज साहेब आले होते. अजित डोवाल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मला सांगितले. यानंतर इम्रान खान यांनी फैज साहेबांना या चर्चेत परराष्ट्र खात्याला सहभागी करून घेण्याचे सांगितले.
मीर म्हणाले की, ‘त्यानंतर जनरल बाजवा आपल्या लाव लष्करासह परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात आले होते. त्यांनी पत्रकारांसमोर सांगितले की, आमचे टैंक हलण्यास सक्षम नाहीत, आमच्याकडे तोफांच्या हालचालीसाठी डिझेल नाही आहे. बाजवा यांनी 20-25 पत्रकारांसमोर आधीच सांगितले की, पाकिस्तानचे सैन्य भारताशी लढण्यास सक्षम नाही. त्या वेळीही ते चुकीचे बोलत असल्याची आम्हाला खात्री होती. यावर परराष्ट्र खात्याने लष्करप्रमुखांच्या बोलण्याला विरोध केला. तेव्हा जनरल बाजवा संतापले. ते म्हणाले की, मोदी एप्रिल 2021 मध्ये पाकिस्तानला भेट देत आहेत.

गोंधळ वाढल्यानंतर मीर यांनी केला खुलासा
हमीद मीर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानातील वाढता गोंधळ पाहून त्यांनी स्वतःच्या बचावासाठी ट्विट केले आहे. मीर यांनी ट्विटरमध्ये लिहिले की, ‘ही गोष्ट पहिल्यांदाच एप्रिल २०२१ मध्ये ‘द हिंदू’ या भारतीय वृत्तपत्राने प्रकाशित केली होती. पण पाकिस्तानी मीडियातील बाजवाचे काही लोक संपूर्ण जबाबदारी इम्रान खान आणि फैज यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

First Published on: April 25, 2023 9:18 PM
Exit mobile version