Hindu Girl Murder In Pakistan: पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात हत्या

Hindu Girl Murder In Pakistan: पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात हत्या

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवरील होणारे अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेते नाहीये. काल, सोमवारी पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आरोपीने भररस्त्यात तिच्यावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ही पाकिस्तानातील सिंधच्या रोही सुक्कूरमधील घटना आहे. पीडितेचे नाव पूजा ओड असून ती अवघ्या १८ वर्षांची होती. तिने आरोपीला विरोध केला, तर आरोपीने भररस्त्याने तिच्या गोळी झाडली. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर खासकरून सिंधमध्ये हिंदू महिलांचे अपहरण केले जाते, त्यानंतर त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जाते. (18-year-old Hindu girl shot dead during abduction attempt in Pakistan)

पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटीज राइट्स आणि सेंटर फॉर सोशल जस्टिसनुसार, २०१३ ते २०१९दरम्यान जबरदस्तीने धर्मांतरण करण्याच्या १५६ प्रकरणांची नोंद झाली आहे. २०१९मध्ये सिंध सरकारने जबरदस्तीने धर्मांतरण आणि दुसऱ्या लग्नाविरोधात बिल आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कट्टरपंथियांनी याचा विरोध केला.

ब्युरो ऑफ स्टेटिस्टिक्स पाकिस्तानच्या अहवालानुसार, पाकिस्तामध्ये हिंदुंची एकूण लोकसंख्या १.६० टक्के आहे. तर एकट्या सिंधमध्ये ६.५१ टक्के हिंदू राहतात. पाकिस्तानमध्ये हिंदू हा मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. सरकारची आकड्यांनुसार, येथे ७५ लाख हिंदू राहतात. परंतु हिंदू समुदायाचे म्हणणे आहे की, त्यांची लोकसंख्या ९० लाख आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये सर्वाधिक हिंदू राहतात. येथे हिंदू-मुस्लिम एकजुटीने राहतात. परंतु या प्रांतातून हिंदू महिलांसोबत अत्याचार होत असल्याच्या बातम्या अधिक येत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये काही मोठे हल्ले झाले होते. यामुळे सियालकोट लष्करी तळावर भीषण आग लागली होती. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती.


हेही वाचा – Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing


 

First Published on: March 22, 2022 10:05 AM
Exit mobile version