भारतीय सैन्याचे पाकला चोख उत्तर, ७-८ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा बंकर्स,लाँच पॅडही केले उदध्वस्त

भारतीय सैन्याचे पाकला चोख उत्तर, ७-८ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा बंकर्स,लाँच पॅडही केले उदध्वस्त

पाकिस्तानच्या कुरापती संपत नाहीत. दिवाळीच्या मुहूर्तावर शस्त्रसंधीचे उल्लघकरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. यात भारताचे तीन जवान शहिद झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार करण्यात केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा भ्याड हल्ला करण्यात आला.  पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्याचे भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या ७-८ सैनिकांचा खात्मा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकर्स,लाँच पॅडही उदध्वस्त करून टाकले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन करण्यात आले. केरन,उरी, नौगामा सेक्टर या ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लघन करण्यात आले. पाकिस्तानकडून या वेळीही भ्याड हल्ला करण्यात आला. यावेळी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. गावाच्या वस्ती असलेल्या ठिकाणांना या वेळी पाकिस्तानने लक्ष केले होते, अशी भारतीय लष्कराने दिली आहे. या हल्ल्यात भारताच्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचप्रमाणे यात तीन जवान जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये LOC ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या वेळी भारतीय सैन्याने हा प्रयत्न उधळून लावला . या हल्ल्यानंतर  जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे उपनिरिक्षक राकेश डोवल हे शहिद झाले आहेत. राकेश डोवल हे उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या गंगानगरचे रहिवासी होते.  दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते शहिद झाले. त्याचबरोबर एक कॉन्स्टेबल ही गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या हात आणि तोंडाला गंभीर इजा झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे ७-८ सैनिकांचा खात्मा करून पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे.


हेही वाचा – निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २६८ कोटींची मदत जाहीर

First Published on: November 13, 2020 8:33 PM
Exit mobile version