पाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकर मंडळीनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन यांनी वाढदिवसानिमित्ता पातळी सोडून टीका केली आहे. यामुळे पाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी उघड झाली आहे. फवाद हुसेन यांनी मोदींवर निशाणा साधल्यामुळे ट्रोल झाले आहेत. सोशल मीडियावरून या टि्वटवर निषेध नोंदवला जात आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्दा केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक टीका केल्या जात आहे. फवाद हुसेन यांनी ‘आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचं महत्त्व काय याची आठवण करून देतो’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी मीम्स तयार करून हुसेन यांना लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

पाकिस्तानमधील सुशिक्षित वर्गाला हुसेन यांनी केलेली टीका आवडलेली नाही. हुसेन आणि इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंजाबमधील प्राध्यापिका आएशा अहमद यांनी चांगलंच सुनावलं आहे. त्या असा म्हणाल्या की, एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानांबद्दल पाकिस्तान सरकारचे एक प्रतिनिधी कशी भाषा वापरत आहेत? जर शत्रूत्व दाखवायचं असेल तर तंत्रज्ञान क्षेत्रात लोकशाहीच्या मार्गानं स्पर्धा करा, असं सांगितलं आहे.

First Published on: September 17, 2019 6:10 PM
Exit mobile version