इम्रान खान यांना वाटतेय पाकव्याप्त काश्मिरची भीती

इम्रान खान यांना वाटतेय पाकव्याप्त काश्मिरची भीती

अमेरिकेचं नाव घेऊन इम्रान खान यांचे मोठे विधान, लाईव्ह स्पीचमध्ये घसरली जीभ

काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर भारताशी युद्ध करण्याची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता नरमले आहेत. त्यांना भारताच्या ताब्यातील काश्मीरपेक्षा आता आपल्या ताब्यातील काश्मिरची चिंता वाटू लागली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसणाच्या प्रयत्न केला तर युद्ध करू अशी धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. बुधवारी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्ताने इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते. त्यांनी तेथील संसदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप केवळ काश्मीरवर थांबणार नाहीत. ते लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसतील. भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता. आता ते पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली.

नक्की वाचा – भारताच्या फायद्यामुळे ट्रम्प यांना पोटदुखी, म्हणाले, ‘भारताला गरज काय?’

ही भीती व्यक्त करताना इम्रान खान तेवढ्यावर थांबलेले नाहीत. त्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्यास आम्ही युद्ध करू. हे युद्ध झाले तर त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल, असे इम्रान खान म्हणाले. काश्मीरसाठी गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ. येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येईल. संयुक्त राष्ट्रांची महासभा सुरू असताना पाकिस्तान विरोध करेल, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

First Published on: August 14, 2019 6:08 PM
Exit mobile version