इम्रान खान यांचा मोदींना काश्मीर प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव; पाठवले पत्र

इम्रान खान यांचा मोदींना काश्मीर प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव; पाठवले पत्र

इम्रान खान आणि नरेंद्र मोदी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काश्मीर प्रश्नावरील चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंबंधीचे एक पत्र लिहिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाद विकोपाला गेलेला असताना इम्रान खान यांनी दुसऱ्यांना दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. भीषण आर्थिक आणि दहशतवादाच्या खाईत सापडलेला पाकिस्तान सर्व काही विसरून पुन्हा चर्चेसाठी तयार झाले आहेत.

दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी इम्रान खान यांनी पत्र लिहिले आहे. खान यांनी पत्रामध्ये दक्षिण आशिया आणि शेजारील देशांमध्ये शांतता नांदण्यासाठी मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काय आहे पत्रात,

लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पुन्हा एकदा जनतेनं पंतप्रधान म्हणून निवडून दिल्याबद्दल मी अभिनंदन करतो. काश्मीरच्या वादग्रस्त मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केल्यास हे प्रश्न सुटू शकतात. जेणेकरून जनता गरिबीतून मुक्त होऊ शकेल. पाकिस्तानला दक्षिण आशियात शांती हवी आहे. त्यामुळेच स्थिरता आणि क्षेत्रीय विकासासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे.

येत्या १३ -१४ जूनला किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान एकत्र येत आहेत. या संमेलनामध्ये उभय नेत्यांमध्ये कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे भारताकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on: June 8, 2019 10:51 AM
Exit mobile version