पाकिस्तानला धक्का! एफएटीएफने एशिया ग्रुपमधून केले ब्लॅकलिस्टेड

पाकिस्तानला धक्का! एफएटीएफने एशिया ग्रुपमधून केले ब्लॅकलिस्टेड

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का देणात आला आहे. टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) एशिया पॅसिफिक ग्रुपने (एपीजी) पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. आजवर पाकिस्तानचा एफएटीएफच्या ‘ग्रे’ यादीत समावेश आहे. यापुढे त्यांचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा झटका मिळाला आहे. आधीच कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान दबलेला दहशतवाद्यांच्या आर्थिक घडामोडींवर फायनान्शिअल अॅक्‍शन टास्क फोर्स (एफएटीएफ) लक्ष ठेऊन होते. त्यात आला ही कारवाईदेखील करण्यात आली आहे.

पाकिस्तान ब्लॅक लिस्ट झाल्याने आता त्यांना वर्ल्ड बँक, आयएमएफ, एडीबी, युरोपियन युनियन सारख्या संस्थांकडून कर्ज मिळणे कठिण होणार आहे. याशिवाय मूडीज्, स्टँडर्ड अँड पूअर यासारख्या संस्थाही पाकचे रेटिंग घटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एफएटीएफच्या पॅसिफिक ग्रुपने जागतिक मापदंड पूर्ण न केल्याने ब्लॅक लिस्ट केले आहे. दहशतवाद आणि मनी लाँडरिंग संदर्भातील ४० पैकी ३२ मापदंड पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांना ब्लॅक लिस्ट केले आहे. एफएटीएफने ब्लॅक लिस्ट केल्याने आता पाकिस्तानला जगभरातून कर्ज मिळवणे आता फार अवघड होणार आहे. एफएटीएफने दिलेल्या वक्तव्यात पाकिस्तानला टेरर फंडिंग रोखण्यासाठी जानेवारी महिन्यापर्यंत अॅक्शन प्लॅन तयार करायचा होता पण, यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरला आहे.

First Published on: August 23, 2019 2:12 PM
Exit mobile version