पाकिस्तानच्या कुरापती; सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन!

पाकिस्तानच्या कुरापती; सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन!

jammu infiltration दहशतवाद्यांची भारतात सर्वात मोठी घुसखोरी, १० दहशतवाद्यांविरोधात पॅरा कमांडोचे सर्च ऑपरेशन सुरु

कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानमध्ये सरकारी आणि लष्करी पातळीवर गहजब उडाला आहे. गोंधळलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्यामुळे आता पाकिस्तानने पुन्हा एकदा आपलं जुनंच हत्यार उपसलं असून आता सीमेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. रविवारी सकाळीच्या सुमारास सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याशिवाय लहान बॉम्ब देखील टाकण्यात आले. भारतीय लष्कराने देखील याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: September 8, 2019 12:13 PM
Exit mobile version