पाकिस्तान कर्ज घेण्याचा विक्रम करणार; १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची योजना

पाकिस्तान कर्ज घेण्याचा विक्रम करणार; १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची योजना

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तान सरकार कर्ज घेण्याबाबत विक्रम करणार असल्याचं चित्र दिसत आहे. आपली जुनी परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि परकीय चलन साठ्यांना बळकटी देण्यासाठी २०२०-२१ आर्थिक वर्षात पाकिस्तान सरकारने एकूण १५ अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याची योजना आखली आहे. हे एका वर्षात पाकिस्तानने घेतलेले सर्वात जास्त कर्ज असेल.

२०२०-२१ आर्थिक वर्षात सुमारे १५ अब्ज डॉलर्सच्या परदेशी कर्जापैकी सुमारे १० अब्ज डॉलर्स जूने कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे, असं पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला सांगितलं. उर्वरित रक्कम देशाच्या बाह्य सार्वजनिक कर्जाचा भाग होईल, जे या वर्षाच्या अखेरीस ८६.४ अब्ज डॉलर्सवर झालं आहे. पाकिस्तानमध्ये कर्जाशिवाय परकीय चलन शक्य नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे असलेले १२ अब्ज डॉलर्सचा एकूण परकीय चलन साठा मुख्यतः कर्जामुळे आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाला द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सावकार, वाणिज्य बँका, युरोबँड जारी करणारे आणि आयएमएफकडून एकूण १५ अब्ज डॉलर्स मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले


आयएमएफने नुकतंच दिलं होतं कर्ज

कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडे आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर आयएमएफने अलीकडेच पाकिस्तानला १.३९ अब्ज डॉलर्स कर्ज जाहीर केले आणि आता ही रक्कम पाकिस्तानला मिळाली आहे.

 

First Published on: June 1, 2020 11:24 AM
Exit mobile version