पाकिस्तानतर्फे सौदी अरेबियाच्या राजपुत्र यांना मिळाले ‘हे’ गीफ्ट

पाकिस्तानतर्फे सौदी अरेबियाच्या राजपुत्र यांना मिळाले ‘हे’ गीफ्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले. बिन सलमान यांनी पाकिस्तानमध्ये २० अब्ज डॉलर्स गुंतवणार अशी घोषणा केली. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही राजपुत्रांनी ही भेट घेतली होती. राजपुत्र नाराज होऊ नयेत यासाठी त्यांनी पाकिस्तानने पुरेपुर प्रयत्न केला. बिन सलमान यांना खुष करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोन्याची मशीन गन त्यांना गीफ्ट केली. सौदी येथे सोन्याचे आकर्षण खूप आहे. अशातच सोन्याची बंदूक मिळाणे हा अनुभव बिन सलमान यांना सुखावणारा होता. बिन सलमान यांनी आनंदाने हे गीफ्ट स्विकारले. पाकिस्तानने दिलेल्या गीफ्टची माहिती सीएनएन वाहिनीने प्रसारीत केली आहे.

पाकिस्तानात तेल शुद्धीकरण प्रकल्प

मोहम्मद बिन सलमानला खुष करण्याचे प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून केले जात आहेत. मोहम्मद बिन सलमान यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये २० अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी प्रसार माध्यमांकडून मिळत आहेत. या करारामध्ये अनेक महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. या प्रकल्पात ८ अब्ज डॉलर्सला तेल शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहेत. मोहम्मद सलमान यांच्या दौऱ्याला एक दिवस उशीराने सुरुवात झाली होती.

First Published on: February 21, 2019 2:41 PM
Exit mobile version