पाकिस्तानी रिपोर्टरची गजब रिपोर्टिंग

पाकिस्तानी रिपोर्टरची गजब रिपोर्टिंग

दुनिया न्यूज चॅनेलचा रिपोर्टर हरमीत सिंह

चांद नवाबनंतर आता आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडिओ वायरल झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या विविध भागामध्ये पाणी साचून तळ्याचे रुप आले आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलच्या रिपोर्टरने लाहौरच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधून रिपोर्टिंग केली आहे. विशेष म्हणजे या रिपोर्टरने लहान मुलांच्या रंगबेरंगे बाथटबमध्ये बसून रिपोर्टिंग केली आहे. पाकिस्तानच्या दुनिया न्यूज चॅनेलचा हा रिपोर्टर आहे.

दुनिया न्यूज चॅनेलच्या हरमीत सिंह या रिपोर्टरने केलेल्या या रिपोर्टिंगचा व्हिडिओ वायरल होत आहे. पाकिस्तानात तर त्यांचा हा व्हिडिओ खूप वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हरमीत सिंह पावसाची मजा घेत बाथटबमध्ये बसून रिपोर्टिंग करत आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी शेअर करण्यात आला. फेसबुकवर या व्हिडिओला १२ हजारपेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत. या व्हिडिओला ५ लाख व्यूज आणि हजारापेक्षा जास्त कमेंट मिळाल्या आहेत.

 

First Published on: July 4, 2018 8:16 PM
Exit mobile version