‘जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकार हे नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे’

‘जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकार हे नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे’

भारताने जम्मू-काश्मीरसंबंधीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हद्दपार केल्यानंतर पाकिस्तानवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. या काश्मीरच्या प्रश्नाबाबत चीन आणि तुर्कस्तान हे दोन देश वगळता कोणत्याही देशाकडून पाकिस्तानला सहानुभूती मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अस्वस्थ झाल्यामुळे त्यांची भारतावर खोटे आरोप करण्यास सुरुवात झाली आहे. इम्रान खान असे म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये भारत सरकार हे नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे. स्रेब्रेनिकामधील हत्याकांडाप्रमाणे काश्मिरातील मुस्लिमांची हत्या होऊ शकते. जर काश्मीरकडे लक्ष दिले नाही तर जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता वाढून हिंसाचार सुरू राहील, असे देखील खान म्हणाले.

जम्मू-काश्मीर निर्णयानंतर पाकिस्ताने भारतासोबतचा व्यापार बंद केला. भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद आणि भारतीय चित्रपटांवर बंदी घातली, असे अनेक वेगवेगळे निर्णय पाकिस्ताने घेतले.बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी इम्रान खान यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसणाच्या प्रयत्न केला तर युद्ध करू अशी धमकी दिली. यानिमित्ताने बुधवारी इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते. तेथील संसदेला त्यांनी संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर हे मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करतील अशी भीती व्यक्त केली. आम्ही काश्मीरला गरज पडलीतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ, असे देखील इम्रान खान म्हणाले.

First Published on: August 15, 2019 5:43 PM
Exit mobile version