राजस्थानमध्ये रामकथेदरम्यान मंडप कोसळला; १७ जण ठार

राजस्थानमध्ये रामकथेदरम्यान मंडप कोसळला; १७ जण ठार

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ ठार

राजस्थानमधील बारमेरमध्ये रामकथेदरम्यान सुरू झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे मंडप कोसळ्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदनासुद्धा व्यक्त केल्या.

राजस्थानातील बारमेरमधली बालोतरा येथे एका वस्तीवर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामकथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळच्या सुमारास आलेले वादळी वारे आणि पावसापुढे हा मंडप तग धरू शकला नाही आणि मंडप भाविकांवर कोसळला. यावेळी मंडपावर विजेची तारसुद्धा कोसळली. या दुर्घटनेत १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेतील जखमींना तात्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

First Published on: June 23, 2019 9:54 PM
Exit mobile version