पानिपतमध्ये ट्रकच्या धडकेत कारने घेतला पेट; आगीत 3 जणांचा जळून मृत्यू

पानिपतमध्ये ट्रकच्या धडकेत कारने घेतला पेट; आगीत 3 जणांचा जळून मृत्यू

हरयाणातील पानिपत जिल्ह्यातील इसराना गावानजीकच्या परिसरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रोहतक राष्ट्रीय महामार्गावरील नव्या धान्यबाजारपेठेजवळ हा अपघात झाला. एका आय-20 कारनं पेट घेतल्यामुळं त्यातील 3 जण जागीच जिवंत जळाले. या कारनं वळण घेणाऱ्या एका ट्रकला पाठीमागून धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली.

HR10-AC5675 या क्रमांकाची ही कार असून सीएनजीवर चालत होती. वळन घेणाऱ्या ट्रकला या कारनं मागून धडक देताच या कारनं पेट घेतला. आग लागल्यामुळं कार अचानक लॉक झाली. त्यामुळं कारमधील 3 जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

या अपघाताची माहिती मिळताच इसराना पोलिसांनी घटनास्थळी दाव घेतली. त्यानंतर अधिक तपासा सुरूवात केली. सद्यस्थितीत या आगीवर नियंत्रण मिळालं आहे. मात्र, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता या गाडीत त्यांची केवळ हाडे उरली होती.

हा अपघात शुक्रवारी दुपारी 12 वाजता झाला. अद्याप एकाहीची ओळख पटली नाही. कार पानिपतच्या गोहोनाला जात होती. कारने पेट घेताच इसराना बाजारपेठ व जवळच्या लोकांनी ती विझवण्यासाठी धाव घेतली. लोकांनी ओरडही केली. पण, त्याचा काहीच फायदा झाला नाही. तब्बल ४५ मिनिटं ही कार जळत होती. त्यावेळी उपस्थितांनी गाडीतील आग विझवली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने गाडी फोडली. कारमध्ये तीन जणांचे मृतदेह पडले होते. तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये जिवंत जाळलेल्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. कारमध्ये जिवंत जाळणाऱ्यांमध्ये बरौतच्या हेलवाडी गावचा विक्रांत राठी, पानिपतचा बराणा गावचा शुगम आणि जलालपूरचा पंकज यांचा समावेश होता. विक्रांतचे वडील सितमलपाल राठी हे लष्करातून निवृत्त झाले असून सध्या ते नूरवाला येथे राहतात. विक्रांत सेक्टर १८ मध्ये भाड्याने राहतो. पोलिसांनी सांगितले की, विक्रांतच्या दोन पॅथॉलॉजी लॅब आहेत. घरात संध्याकाळी देवीचे जागरणही होते. त्यांची पत्नी रेणू राठी फिजिओथेरपिस्ट असून त्यांना दोन महिन्यांचा मुलगा आहे.


हेही वाचा – मराठी हृदयसम्राटच्या जागी राज ठाकरेंना ‘हिंदुजननायक’ नवी उपाधी

First Published on: April 15, 2022 5:34 PM
Exit mobile version