तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये फूट! पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी, AIADMKचे मुख्यालय सील

तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये फूट! पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी, AIADMKचे मुख्यालय सील

तमिळनाडू येथे अन्नाद्रमुकच्या ईडापड्डी येथील पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वमच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात तोड फोड केली. यानंतर अधिकाऱ्यांनी सोमवारी तामिळनाडूमधील पक्षाचे मुख्यालय सील केले. पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर ते म्हणाले की ते न्यायालयात जातील, कायदेशीर कारवाई करतील आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देतील.

यानंतर ते पक्ष कार्यालयातून बाहेर पडले. महसूली अधिकाऱ्यांनी अन्नाद्रमुक मुख्यालय ‘एमजीआर मालिगाई’ सील केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्ष कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना पोलिसांनी हाकलून लावले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हिंसाचार झाला आणि त्यानंतर त्यांनी आवई षणमुगम सलाई येथील अन्नाद्रमुक मुख्यालयाची तोडफोड केली.

पलानीस्वामी यांनी पन्नीरसेल्वम यांना सत्ताधारी द्रमुकची कठपुतली म्हटले असून हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरले आहे. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष कार्यालयातून पक्षाच्या दिवंगत प्रमुख जयललिता यांच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रे बाहेर काढल्याचा आरोपही केला आहे.

First Published on: July 11, 2022 5:13 PM
Exit mobile version