Union Budget 2021: अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार – पंतप्रधान मोदी

Union Budget 2021: अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार – पंतप्रधान मोदी

कोरोनाची लाट थांबवणं आवश्यक - पंतप्रधान मोदी

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरू होईल. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मोदी म्हणाले. याशिवाय, सहकार्याची अपेक्षा देखील मोदींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वी होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या आधी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण आज संसदेत सादर केला जाईल. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दशकाचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी जी स्वप्नं सुरुवातीला पाहिली होती ती पूर्ण करण्याची संधी देशाकडे आली आहे. २०२० च्या कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी छोटी-मोठी पॅकेज जाहीर करण्यात आली. दरम्यान, आता सादर होणारा अर्थसंकल्प त्याचच एक पुढचं पाऊल मानतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या आधी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण आज संसदेत सादर केला जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षण हे सध्याच्या आर्थिक वर्षाचा लेखा-जोखा असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत असेल, ज्यामध्ये पहिले सत्र १ फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर दुसरं सत्र ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत चालणार आहे.

 

First Published on: January 29, 2021 11:07 AM
Exit mobile version